साखर कारखान्यातर्फे परिसरात सॅनिटायझेशन मोहीम

मुझफ्फरनगर: बुढाना येथे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर नगरपालिकेच्या टीमने परिसरात सॅनिटायझेशन मोहीम राबवली. तर उप जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बजाज साखर कारखान्याने गुरुवारी सॅनिटायझेशन मोहीम सुरू केली. यावेळी बाजारपेठ, मुख्य रस्ते, तहलीस कार्यालय, बँक, पोलिस चौकी परिसरही सॅनिटायझेशन करण्यात आले. दरम्यान, भारतीय किसान युनीयनच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन साखर कारखान्यात ऑक्सिजनयुक्त कायमस्वरुपी हॉस्पिटलची मागणी केली आहे. सर्व गावात कोरोना पसरला आहे. गरीब शेतकऱ्यांना हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ऑक्सिजनयुक्त हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना तालुका अध्यक्ष अनुज बालियान, विभागीय अध्यक्ष संजीव पवार, परवीन, परविदर, पिन, तैमूर, नसीम आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here