सामाजिक बांधिलकी जपत “शाहू ग्रुप “च्या वतीने सभासदांना अल्प दरात सॅनिटायजरचा पुरवठा: अध्यक्ष श्री. समरजितसिंह घाटगे

कोरोनावर मात कण्यासाठी अनेकजण आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. या काळात वैयक्तिक स्वच्छता व सामाजिक स्वास्थ्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. आज कोरोना संकटाच्या काळात सॅनिटायझरची कमतरता जाणवत आहे. सर्वसामान्यांना हॅन्ड सॅनिटायझर सहजपणे मिळावे या अनुषंगाने शाहू कारखान्यातर्फे डिस्टलरी प्रकल्पामार्फत ‘फास्ट ओ क्लिन’ या नावाने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती सुरू आहे. कारखान्याचे सर्व सभासद, शाहू ग्रुप अंतर्गत असलेल्या सर्व संस्थांचे कर्मचारी तसेच ज्या ऊस उत्पादकांनी हंगाम 2019-20 साठी कारखान्यास ऊस पुरवठा केला आहे त्यांना हे सॅनिटायझर सवलतीच्या दरात देण्यात येत आहे.

कोरोनाच्या लढ्यामध्ये या संकटावर मात करण्यासाठी विविध उपपाययोजना राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज जगासमोर असलेले हे संकट लवकरच दूर होईल व पुन्हा सर्व स्थिती पूर्ववत होईल असा विश्वास आहे. आपण काळजी घेऊया व देशासमोरील हे संकट दूर करण्यास सहकार्य करूया असे मत कारखान्याचे अध्यक्ष श्री. समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक, संचालक मंडळ व अधिकारी यांचे सहकार्य लाभले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here