लोकमंगल साखर कारखान्या कडून सॅनिटायजरचे वाटप

सोलापूर : लोकमंगल साखर कारखान्याच्या वतीने सॅनिटायजरचे उत्पादन सुरु केले आहे. उत्पादित सॅनिटाजरचे वाटप कारखान्याच्या वतीने करण्यात आले.

लोकमंगल उद्योग समूह नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो, याच सामाजिक भावनेतून, कोरोना महामारी पासून बचाव होण्यासाठी वापरले जाणारे हॅन्ड सॅनिटायजर सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर व तालुक्यातील सर्व पोलीस ठाणे, सरकारी आणि निमसरकारी कार्यालये, बँक, पथ संस्था, महावितरण मुख्यालय तसेच ग्रामीन रुग्णालये या ठिकाणी वाटण्याच्या आले. कारखान्याने या उत्पादनाला “स्टेरिनॉल” असे नाव दिले आहे. सॅनिटायजरचा वापर करून आपण कोरोना पासून आपला व आपल्या कुरुंबाचा बचाव करू शकतो, असे कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख यांनी सांगितले.

सदर सॅनिटायजर 100 मिली, 200 मिलि, 500 मिली, 1 लिटर ,आणि 5 लिटर मध्ये उपलब्ध आहे, कारखान्याची उत्पादन क्षमता 10,000 लिटर प्रतिदिन इतकी आहे. तरी ज्या व्यक्तींना सॅनिटायजरची गरज असेल त्यांनी रवींद्र देशमुख, विवेक पवार आणि शरणु शिरसी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी कारखान्याचे प्रशासकीय व्यवस्थापक विवेक पवार, श्रीकांत गरड, नंदकिशोर कदम, यल्लाप्पा जाधव, श्रीशल्य लोखंडे, प्रवीण आळवी, कासीम शेख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here