दत्त शिरोळ कारखान्यातर्फे सॅनिटायजरचे उत्पादन

100

शिरोळ: कोरोना आजारावर औषध नसल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. त्यामध्ये सॅनिटायजरचा वापर महत्वाचा आहे. मात्र सॅनिटायजरचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे ओळखून दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या पुढाकारातून दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सॅनिटायजरचे उत्पादन सुरु केले आहे.

हे सॅनिटायझर्स माजी आमदार स्व. सा.रे. पाटील फौंडेशनच्या वतीने शिरोळ तालुक्यातील नगरपालिका व मोठ्या ग्रमापंचायतींना सॅनिटायजरचे मोफत वाटप करण्यात आले.

सासमाजिक बांधिलकीतून नेहमीच सा.रे. पाटील फौंडेशन कार्य करीत आसून, त्यांच्याकडून शिरोळ तालुक्यातील शिरोळ, जयसिंगपूर व कुरुंदवाड या तीन नगरपालिकांना, तर तालुक्यातील मोठ्या ग्रमापंचायतींना व अन्य गावातील ग्रामपंजायतींना तसेच पोलीस व आरोग्य विभागांनाही सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. एकूण चारशे लीटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here