संत दामाजी कारखान्याच्या ३१ व्या गळीत हंगामाची सांगता

सोलापूर : संत दामाजी कारखान्याने दुष्काळी स्थिती असतानाही चालू हंगाम सभासद, कामगार, ऊस उत्पादकांच्या जोरावर यशस्वी केला. १९८ कोटींचे कर्ज असतानाही कारखान्याने शेतकरी, वाहतूक ठेकेदार व वाहनमालकांची देणी वेळेत देण्याची भूमिका घेतली. कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले. कारखान्याच्या ३१ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन तानाजी खरात होते.

यावेळी सर्वाधिक ट्रॅक्टरद्वारे ऊस तोडणी व पुरवठा बंडू करे, सुनील जाधव, संजय जाधव, बैलगाडी द्वारे सर्वाधिक ऊसतोडणी व पुरवठा सखाराम पठाडे, आदिनाथ पन्हाळकर, गोरख पठाडे, डम्पिंग ट्रॅक्टरद्वारे ऊसतोडणी व पुरवठा वसंत दोलत डे, सुभाष होनमाने, विकास चव्हाण, मशीनद्वारे ऊसतोडणी व पुरवठा बसवराज पाटील, महादेव लुडगे यांचा सत्कार करण्यात आला. दिगंबर भाकरे यांनी प्रास्ताविक केले. अशोक उन्हाळे यांनी सूत्रसंचालन केले. शेती अधिकारी कृष्णा ठवरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here