संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर्समध्ये दिवसात विक्रमी २४०१ टन ऊस गाळप

पैठण : संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर्सने (Sachin Ghayal Sugars) आता नव्या गाळप क्षमतेसह विक्रमी वाटचाल सुरू केली आहे. कारखान्यामध्ये १० जानेवारी २०२२ रोजी, २४ तासांत २४०१ टन ऊसाचे गाळप करण्यात आले. गेल्या ४३ वर्षात प्रथमच कारखान्याने हा विक्रम केला आहे.

कारखाना, यापूर्वीच्या गळीत हंगामात प्रतीदिन १६०० ते १७०० टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करू शकत नव्हता. मात्र, संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर्सचे चेअरमन तुषार शिसोदे व चेअरमन सीए सचिन घायाळ यांनी कारखान्यात आमूलाग्र बदल करण्याचा आणि तालुक्यातील सभासद, शेतकऱ्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा शब्द दिला होता. साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिन २५०० टन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो पूर्ण करत चेअरमन सचिन घायाळ यांनी आधुनिक यंत्र सामुग्री बसवली. हे बदल पूर्ण करून प्रत्यक्षात विक्रमी गाळपाच्या दिशेने वाटचाल केल्याबद्दल त्यांचे उस उत्पादक, शेतकरी सभासदांकडून अभिनंदन होत आहे.

११ जानेवारी रोजी कारखान्याच्या शेती विभाग व ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्यावतीने चेअरमन सीए सचिन घायाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन घायाळ म्हणाले की, कारखाना चालवत असताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, यंदा कारखान्यामध्ये जवळपास १६ कोटी रुपयांची गुंतवणूक करुन गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. आगामी गाळात, प्रतीदिन २५०० ते २७०० टन ऊस गाळप होणार असल्याचे घायाळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here