ऊसाची बिले देण्यात यमुनानगरचा सरस्वती साखर कारखाना ठरला अव्वल

यमुनानगर : शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात यमुनानगरच्या सरस्वती साखर कारखान्याने हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना मागे टाकले आहे. शेतकऱ्यांना ५६५ कोटी ६३ लाख रुपये देण्यात आले आहेत. कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप मोठे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. कारखान्याशी यमुनानगर जिल्ह्यासह कुरुक्षेत्र आणि अंबाला जिल्ह्यातील शेतकरीही जोडले गेले आहेत.

हंगामातील ज्या शेतकऱ्यांनी ऊस पाठवला होता, त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. हरियाणा आणि इतर राज्यातील साखर कारखाने अद्याप शेतकऱ्यांना पूर्ण पैसे देऊ शकलेले नााहीत. सरस्वती साखर कारखान्याने ३० जून रोजी सर्व शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले आहेत. दरम्यान, कारखान्याने आगामी हंगामासाठीचे लक्ष्य वाढवले आहे. १७५ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. यंदा १६२ लाख क्विंटल गाळप करण्यात आले. गेल्यावर्षी १६४ लाख क्विंटलचे गाळप करण्यात आले होते. इथेनॉल प्लांटच्या हेतूने उद्दीष्टात वाढ करण्यात आली आहे. हा प्लांट ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. या प्लांटसाठी २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

यंदा कार्यक्षेत्रात ऊसाची लागण वाढली आहे. गेल्यावर्षी ८५ हजार एकरमध्ये ऊस लागण केली होती. यंदा ती ९० हजार एकरवर पोहोचली आहे. उसाचे पिकही चांगले आले आहे. मात्र, पाणीटंचाई भासू शकते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here