गोपालगंजमध्ये सासामुसा कारखान्याच्या कामगारांचे पगारासाठी आंदोलन

गोपालगंज : गेल्या सात महिन्यापासून पगार न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेल्या सासामुसा साखर कारखान्याच्या कामगारांनी कारखाना परिसरात आंदोलन करून संताप व्यक्त केला. यावेळी कारखाना प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कारखान्याच्या कामगारांनी दीर्घकाळ आंदोलन करूनही अनेक तास प्रशासनाशी संबंधीत कोणीही आंदोलनाकडे फिरकले नाही.

आंदोलन दिवसभर सुरू राहीले. डिसेंबर २०२० पर्यंत पगाराच्या स्वरुपात काही रक्कम कारखाना प्रशासनाकडून दिली जात होती. त्यात कुटुंबाची कशीबशी गुजराण सुरू होती. मात्र, गेल्या सात महिन्यात कारखाना प्रशासनाने पगारापोटी एक रुपयाही दिलेला नाही. त्यामुळे कारखान्याचे कर्मचारी, कुटुंबीय आर्थिक संकटात आहेत. अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. सासामुसा कारखान्यात चारशे कामगार काम करतात. त्यातील बहुसंख्य कामगार बाहेरील जिल्ह्यातील आहेत.

आंदोलन करणाऱ्यांमध्ये मोहम्मद कासिम, निसार अहमद, शंभू कुमार, मोहम्मद मतीन, रामनाथ ठाकुर, शंभू पांडेय, रामाश्रय सिंह, मोहम्मद हसन ,श्रीराम सिंह, अब्दुल वहाब यांसह कर्मचारी सहभागी होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here