सातारा : जिल्ह्यात सेंद्रिय गुळ, पावडर, काकवी निर्मितीवर भर

सातारा : सातारा जिल्ह्यात साखरेच्या पट्ट्यात सेंद्रिय गुळ निर्मिती जोमाने होत आहे. मागणी वाढल्याने अनेक व्यावसायिक सेंद्रिय गुळ बनवताना दिसत असून सेंद्रिय गुळ पावडर, सेंद्रिय काकवी यांचीदेखील निर्मिती गुऱ्हाळ घरांमध्ये होत आहे. जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षामध्ये पारंपरिक गूळनिर्मिती करणारी गुऱ्हाळघरेही डबघाईस आली आहेत. सध्या गूळ तयार केला जातो. मात्र, आता अनेक गुऱ्हाळ व्यावसायिकांनी पारंपरिक पद्धत बंद करून सेंद्रिय गूळनिर्मिती सुरू केली आहे. मोजकीच गुऱ्हाळघरांत पारंपरिक पद्धतीने पारंपरिक रासायनिक गुळापेक्षा सेंद्रियला जास्त मागणी आहे.

जिल्ह्यात बहुतांशी सधन भागात आजही मोठ्या प्रमाणात उस पिकवला जातो. कराड तालुक्याच्या लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रात उसाचे उत्पादन घेतले जाते. आता चांगला दर आणि कमी मनुष्यबळ लागत असल्याने सेंद्रिय गुळाचे उत्पादन करणारी गुऱ्हाळघरे दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. सेंद्रिय म्हणजे ऊस व गूळ यामध्ये कोणतेही रासायनिक घटक वापरले जात नाहीत. अनेकदा शहरात रसायनविरहित गूळच सेंद्रिय म्हणून विकला जातो. याला होलसेलला ५० तर रिटेलला ५५ रुपये प्रती किलो दर मिळत आहे. गुऱ्हाळ व्यावसायिक सेंद्रिय गुळाच्या अर्धा, एक, पाच, दहा व वीस किलोच्या ढेपा काढतात. त्यापैकी अर्धा आणि एक किलोच्या ढेपेला मागणी असते. गुळ परराज्यात पाठविला जातो. मात्र, वाहतुकीचा खर्च मिळून दर थोडा वाढतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here