सातारा : जयवंत शुगर्समध्ये मिल रोलर पूजन

सातारा : येत्या गळीत हंगामासाठी धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यात संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. ‘जयवंत शुगर्स’चे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, टेक्निकल विभागाचे उपसरव्यवस्थापक आर. आर. इजाते, फायनान्स विभागाचे सरव्यवस्थापक व्ही. आर. सावरीकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी धार्मिक विधी करण्यात आले. कार्यक्रमाला ‘जयवंत शुगर्स’चे चीफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चीफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, डिस्टीलरी मॅनेजर व्ही. जी. म्हसवडे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, मुख्य शेती अधिकारी आर. जे. पाटील, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, ईडीपी मॅनेजर ए. एल. काशिद, एचआर मॅनेजर एस. एच. भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, सेफ्टी ऑफिसर एस. व्ही. शिद, असि. सेल्स ऑफिसर वैभव मोहिते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here