आजरा कारखान्यात सतेज पाटील-विनय कोरे गटाची एक जागा बिनविरोध

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व आमदार विनय कोरे गटाची एक जागा बिनविरोध निवडून आली. माघारीदिवशी भटक्या विमुक्त जाती गटातून शिवसेनेचे संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बजाजी मिसाळ यांनी माघार घेतल्याने चराटी-शिंपी-रेडेकर- शिंत्रे गटाला पहिले यश मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेवटच्या टप्प्यात पॅनेल उभे केल्याने दुरंगी लढत होणार आहे.

गेल्या पाच दिवसांपासून या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आघाडी करण्याचा प्रयत्न मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे हे करत होते. परंतु जागा वाटपानंतर अचानक राष्ट्रवादीने निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सतेज पाटील, विनय कोरे यांनी एकत्र येत आपली आघाडी जाहीर केली. माघारीच्या दिवशी सकाळी निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.

अर्ज माघारीदिवशीच भटक्या विमुक्त जाती गटातून बजाजी मिसाळ व विकास बागडी यांनी माधार घेतल्याने संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे देवचाळोबा विकास आघाडीला पहिले यश मिळाले. छानणीनंतर १४६ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ९९ जणांनी माघार घेतली तर ४७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. २० जागेसाठी ४९ अर्ज व ६ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here