सौदी अरेबिया: जादा वेतनासाठी साखर कारखान्यांच्या कामगारांचे आंदोलन

युनायटेड शुगर कंपनीशी (यूएससीई) संलग्न शेकडो कामगारांनी अरबी वाणिज्य दूतावासासमोर जादा वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन केले.

यूएससीईची मालकी सौदी स्थित सवोला समुहाकडे आहे. कंपनीमधील सुमारे ३५० कामगार आपल्या मागण्यांसाठी पोर्ट तौफीक येथील वाणिज्य दुतावासासमोर एकत्र आले. युएससीईमधील कारखान्यांमध्ये गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांमुळे ऐन सोखा बंदरातील उत्पादन बंद पडले आहे.

प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार कामगारांनी दरमहा ५०० ते ९०० रियालपर्यंत जोखीम भत्ता दिला जावा अशी मागणी केली आहे. तर काही कामगारांनी कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची अॅलर्जी असल्याचे म्हटले आहे.
कामगार सिंडिकेटचे सदस्य तलत महमूद यांनी सांगितले की, संचालक मंडळ आमच्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याचे कामगारांनी स्पष्ट केले आहे. कारखाने बंद करून कामगारांना काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here