बिहारमध्ये शाळा, कॉलेज सुरू होणार, मुख्यमंत्री नितीशकुमार यांची घोषणा

बिहारमध्ये हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे. कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

कोविडच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून आता दुकाने, संस्था, शॉपिंग मॉल, उद्याने तसेच धार्मिक स्थळे नेहमीप्रमाणे खुली होतील असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आणखी एका ट्विटमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व विद्यापीठे, कॉलेज, तंत्र शिक्षण संस्था आणि पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा खुल्या केल्या जातील. यासोबतच क्लासेस सुरू करण्यात येणार आहेत.

पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृहे, क्लब, जीम, स्वीमिंग पूल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू होऊ शकतात. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून बिहारच्या जनतेने सावधगिरी बाळगली पाहिजे असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य होत आहे. देशात गेल्या २४ तासात ३७,५९३ नवे कोविड रुग्ण आढळले आहेत. तर ६४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी देशात २५,४६७ रुग्ण आढळले होते. कोविडमधून बरा होण्याची टक्केवारी ९७.६७ वर पोहोचली असून सक्रिय रुग्णसंख्येत किरकोळ वाढ झाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here