हंगाम २०२१-२२ : उत्तर प्रदेशात आतापर्यंत ७२.४३ टक्के ऊस बिले अदा

उत्तर प्रदेशातील गळीत हंगाम २०२१-२२ समाप्तीच्या दिशेने जात आहे. आणि साखर उत्पादनात घट दिसून आली आहे. मात्र, सरकारने ऊस बिले देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे साखर कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, २८ एप्रिल २०२२ पर्यंत राज्यात साखर कारखान्यांनी ९६९.८५ लाख टन उसाचे गाळप करुन ९८.२२ लाख टन साखर उत्पादित केली आहे. ऊस बिले देण्यामध्ये आतापर्यंत २३,१९८.७४ कोटी रुपये म्हणजे ७२.४३ टक्के पैसे दिले आहेत. गेल्या हंगामात राज्यात १०२७.५० लाख टन ऊस गाळप करुन ११०.५९ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली होती.

सध्याच्या सरकारकडून गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये २३,१९८.७४ कोटी रुपये, गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ३२,९३१.६३ कोटी रुपये, गळीत हंगाम २०१९-२० मधील ३५,८९८.८५ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. तर २०१८-१९ मधील ३३,०४८.०६ कोटी रुपये, २०१७-१८ मधील ३५,४४४.०६ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. यासोबतच गेल्या गळीत हंगामातील १०,६६१.८५ कोटी रुपयांसह आतापर्यंत एकूण १,७१,१८३.१९ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना मिळाली आहेत.

चालू गळीत हंगामात देशात उच्चांकी साखर निर्यात आणि उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादनातील सर्वाधिक वाढ दिसून आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here