हंगाम २०२१-२२ : महाराष्ट्रातही साखर कारखाने बंद होण्याची प्रक्रिया सुरू

देशातील अनेक साखर उत्पादक राज्यांमध्ये साखर कारखान्यांनी गळीत हंगाम संपुष्टात आणण्यास सुरुवात केली आहे. तर महाराष्ट्रातही याची सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्राच्या साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीनुसार, ४ मार्च २०२२ अखेर राज्यात २ साखर कारखाने बंद झाले आहेत. सद्यस्थितीत कोल्हापूर विभागातील २ कारखाने बंद झाले असल्याचे सांगण्यात आले.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ४ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ९७५.४७ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात १००३.८९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.२९ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये ४ मार्च २०२२ पर्यंत कोल्हापूर विभागात २२६.४० लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे तर २६४.७५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. येथील साखर उतारा ११.६९ टक्के झाला आहे. महाराष्ट्रात साखर उताऱ्यात नेहमीच कोल्हापूर विभाग अग्रेसर राहिला आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात भाग घेतला आहे. येथे ४ मार्च २०२२ पर्यंत २२९.३६ लाख टन उसाचे गाळप करून २१३.१० लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here