हंगाम २०२१-२२ : उत्तर प्रदेशात साखर उत्पादन घटण्याचा अंदाज

लखनौ : देशातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये या हंगामात साखर उत्पादन कमी होण्याचे अनुमान आहे. इथेनॉलकडे वळविलेला ऊस हे यामागील मुख्य कारण आहे. यासोबतच ऊसावरील वाढते रोग, किडींचा हल्ला यामुळेही उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उताऱ्यात फरक दिसून येत आहे.

फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखानदारांनी सांगितले की, तापमानात अचानक वाढ झाल्याने साखरेच्या उताऱ्यावर प्रतिकूल परिणाम पडल्याची शक्यता आहे. तापमान अचानक वाढत आहे. यापूर्वी तापमान ३७-३८ डिग्री पर्यंत पोहोचले होते. पुढील आठवड्यात ते ४० डिग्रीपर्यंत पोहोचू शकते. इस्माने २०२१-२२ या हंगामात उत्तर प्रदेशात १०२ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविली होता. मात्र, गेल्या वर्षी ११०.५९ लाख टन उत्पादन झाले होते. २५ कारखान्यांनी आधीच गाळप बंद केले आहे. त्यापैकी बहुतांश कारखाने पूर्व विभागातील आहेत. उर्वरित बहुतांश कारखाने एप्रिलपर्यंत गाळप पूर्ण करतील.

उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी २३ मार्चपर्यंत ८१७.०१ लाख टन उसाचे गाळप केले आहे. आणि ८२.२८ लाख टन साखर उत्पादित केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत शेतकऱ्यांना १८०३२.७४ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. एकूण बिलांच्या तुलनेत हे प्रमाण ७०.५९ टक्के आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here