उत्तर प्रदेशात साखर उत्पादन १०० लाख टनापर्यंत पोहोचले आहे. राज्यात २०२१-२२ हा गळीत हंगाम समाप्तीच्या दिशेने जात आहे. साखर उत्पादन गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी झाले आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, २ मे २०२२ पर्यंत राज्यात साखर कारखान्यांनी ९७९.६१ लाख टन उसाचे गाळप करुन ९९.२२ लाख टन साखर उत्पादित केली आहे. ऊस बिले देण्यामध्ये आतापर्यंत २३,८१५.४२ कोटी रुपये म्हणजे ७३.१३ टक्के पैसे दिले आहेत. गेल्या हंगामात राज्यात १०२७.५० लाख टन ऊस गाळप करुन ११०.५९ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली होती.
राज्यात गेल्या हंगामातील जवळपास शंभर टक्के ऊस बिले अदा झाली आहेत. सध्या प्रशासनाने चालू गळीत हंगाातील बिले देण्याचे नियोजन चालवले आहे.
चालू गळीत हंगामात देशात उच्चांकी साखर निर्यात आणि उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादनातील सर्वाधिक वाढ दिसून आली आहे.