हंगाम २०२१-२२ : कोल्हापूर विभागात साखर उतारा ११.७४ टक्क्यांवर

महाराष्ट्रात या हंगामात उच्चांकी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये कोल्हापूर विभागाचे सर्वाधिक योगदान आहे. कोल्हापूर विभाग फक्त ऊस आणि साखर उत्पादनातच नव्हे तर साखर उताऱ्यामध्येही चांगली कामगिरी करत आहे.

महाराष्ट्राच्या साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये २१ मार्च २०२२ पर्यंत कोल्हापूर विभागात एकूण ३६ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये २६ सहकारी आणि १० खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत २४३.१७ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. विभागात आतापर्यंत २८५.५७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ११.७४ टक्के आहे.

जर राज्याचा विचार केला तर, २१ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केला आहे. कोल्हापूर विभागातील १४, सोलापूर विभागातील तीन, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील प्रत्येकी एक साखर कारखाना बंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here