सोलापूर जिल्ह्यात हंगाम अंतिम टप्प्यात, फक्त ४ कारखाने सुरू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ३५ पैकी ३१ साखर कारखान्यांचा पट्टा पडला असून अवघे चार साखर कारखाने अद्याप चालू आहेत. गळीत हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी ६२ लाख ६६ हजार २०५ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर १ कोटी ५३ लाख ६१ हजार ३८० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ऊस गाळपात पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना अग्रस्थानी असून या कारखान्याने १८ लाख ३४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर साखर उताऱ्यामध्ये श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. कारखान्याचा साखर उतारा १०.८७ टक्के आहे. जिल्ह्यात ३१ मार्च २०२४ पर्यंत एकूण ऊस गाळप १ कोटी ६२ लाख ६६ हजार २०५ मेट्रिक टन झाले असून एकूण साखर उत्पादन ०१ कोटी ५३ लाख ६१ हजार ३८० क्विंटल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here