सोलापूर जिल्ह्यात ३४ कारखान्यांचा हंगाम समाप्त

सोलापूर : यंदा जिल्ह्यात १३ सहकारी आणि २२ खासगी, अशा एकूण ३५ साखर कारखान्यांची धुराडी पेटली होती. त्यातील ३४ कारखान्यांचे गाळप संपले आहे. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे गाळप चालू आहे. आतापर्यंत एक लाख ५६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून जवळपास एक कोटी ५७ लाख ४९ हजार ५९७ क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एकमेव साखर कारखान्याचे गाळप येत्या काही दिवसांत बंद होणार आहे. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप साखर कारखान्यांनी केले आहे. धरण, नद्यांच्या पट्ट्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने यंदाच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील बऱ्याच साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले आहे. याबाबत प्रादेशिक साखर उपसंचालक पांडुरंग साठे यांनी सांगितले की, यंदाच्या गाळप हंगामात जिल्ह्यात १३ सहकारी, २२ खासगी, अशा एकूण ३५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होता. त्यातील ३४ कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केला आहे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे गाळप अद्यापही सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here