नागपूर : महाराष्ट्रातील नागपूरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे दर्शन झाले आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून नव्याने संक्रमित दहापट रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर राऊत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
कोविड १९च्या गेल्या दोन लाटांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेतून सावरताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात याबाबत तयारी केली जाईल असे सांगितले होते. अलिकडे त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत इशाराही दिला होता.
राज्याचे कॅबिनेट मंत्री राऊत यांनी अलिकडेच अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी संकेत दिले की स्थानिक पातळीवर प्रशासन संक्रमण रोखण्यासाठी निर्बंधांची घोषणा करू शकते. या बैठकीत पोलिस, महसूल आणि आरोग्य विभागासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले, शहरात तिसरी लाट दाखल झाली आहे. कारण गेल्या दोन दिवसांपासून दुप्पट संख्येत संक्रमित आढळत आहेत.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना राऊत म्हणाले की, प्रशासन आणखी एक ते तीन दिवसांत आढावा घेऊन दुकाने आणि आस्थापनांवर निर्बंध लागू करेल. निर्बंध निश्चित असतील. कारण लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आणि विदर्भात ऑगस्ट महिन्यात रुग्ण संख्येत लक्षणीय घट दिसून आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून येथे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले आहे. मात्र दहा दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचे नवे नियम लागू केले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link