सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

कराड : चीनीमंडी

सातारा जिल्ह्यातील रयत-अथणी साखर कारखान्याला साखर आयुक्तालयाने जप्तीची नोटिस पाठवली आहे. कारखान्याने २०१८-१९ च्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे न दिल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. कारखान्याने शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे थकवल्याने बळीराजा शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची गंभीर दखल साखर आयुक्तांनी घेतली. संघटनेने २७ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे आयुक्तांनी जप्तीच्या कारवाईचे आदेश सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले.

कायद्यानुसार शेतकऱ्यांने कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत त्याला पैसे देण्याची तरतूद आहे. अन्यथा थकीत रकमेवर कारखान्याला व्याजही द्यावे लागते. पण, अथणी शुगर्सकडे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या ५६७ लाख रुपये थकीत आहेत. त्यामुळे बळी राजा शेतकरी संघटनेने या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. ऊस नियंत्रण कायदा १९६६ नुसार असलेल्या तरतुदीतूनच कारखान्याची साखर जप्त करण्याचे (आरआरसी कारवाई) आदेश देण्यात आले आहेत. यात साखरेबरोबर मळी, बगॅस अशी इतर जंगम मालमत्ता जप्त केली जाते. त्यातून वसूल होणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांचे पैसे भागवले जातात. त्याप्रमाणेच कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. थकीत रकमेवरील १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here