अशोक कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी हिम्मतराव धुमाळ यांची निवड

अहिल्यानगर:अशोक साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी हिम्मतराव धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी प्रादेशिक सह संचालक (साखर) गणेश पुरी यांच्या
अध्यक्षतेखाली कारखाना सभागृहात यासाठी बैठक झाली.धुमाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने या पदासाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आले.

धुमाळ यांचे नाव बाबासाहेब आदिक यांनी सूचवले.आदिनाथ झुराळे यांनी अनुमोदन दिले. यावेळी कारखान्याचे चेअरमन तथा माजी आ. भानुदास मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर व संचालक उपस्थित होते. निवडीनंतर धुमाळ यांचा मुरकुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चेअरमन मुरकुटे म्हणाले की, लोकसेवा विकास आघाडीने व्हा चेअरमनपद दरवर्षी बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नवी निवड प्रक्रिया झाली आहे.त्यांनी पुरी यांचे यांचे आभार मानले.निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here