‘भारतीय शुगर’च्या व्हाईस प्रेसिडेंटपदी मनोहर जोशी यांची निवड

कोल्हापूर : भारतीय शुगर या साखर उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल देशपातळीवरील अग्रेसर असलेल्या संस्थेच्या व्हाईस प्रेसिडेंट (व्यवस्थापन) पदी येथील मनोहर जोशी यांची निवड करण्यात आली. ते हुपरी (ता. हातकणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. मनोहर जोशी हे सलग ३५ वर्षे कार्यकारी संचालक म्हणून उत्तम व्यवस्थापन करत आहेत. या कालावधीत त्यांनी कारखान्याची ऊस गाळप क्षमता १६ हजार मेट्रिक टनांपर्यंत करून २७ मेगॅवॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पही कार्यान्वित केला आहे. कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते जोशी यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भारतीय शुगर संस्थेचे प्रेसिडेंट विक्रमसिंह शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह शिंदे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here