‘हुतात्मा’च्या कार्यकारी संचालक पदी समीर सलगर यांची निवड

सांगली : वाळवा येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदी समीर सलगर यांची निवड करण्यात आली. याबद्दल कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक, अधिकारी उपस्थित होते.

वैभव नायकवडी म्हणाले कि, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने नेहमीच शेतकरी, कामगारांचे हित जोपासले आहे. भविष्यातही कारखाना प्रशासन, संचालक मंडळ शेतकरी हितालाच प्राधान्य देऊन सहकारातील आपली वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न करील असे सांगितले. सलगर म्हणाले कि, कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे लौकिकात भर घालण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here