गुरुवारी सोलापूरात होणार शेतकर्‍यांसाठी ऊस परिसंवाद

दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई यांच्या वतीने सोलापूर येथील जामगुंडी मंगल कार्यालय येथे गुरुवारी (दि.5) शेतकर्‍यांसाठी ऊस परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. दिवसभर चालणारा हा कार्यक्रम पाच सत्रांमध्ये विभागण्यात आला आहे.

पहिल्या सत्रात माळेगाव पुणे, येथील मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेशराव जगदाळे ‘ऊस उत्पादन खर्च व व्यवस्थापन‘ हा विषय शेतकर्‍यांसमोर मांडणार आहेत. दुसर्‍या सत्रात कृषी भूषण संजीव माने ‘बियाणे व ऊस लागवड‘ या विषयावर बोलणार आहेत. तिसर्‍या सत्रात तात्यासाहेब कोरे वारणाचे कार्यकारी संचालक शहाजी भगत ‘ऊस पीक व पाणी व्यवस्थापन‘ बाबत मार्गदर्शन करणार आहेत. चौथ्या सत्रात जवाहर साखर कारखान्याचे मुख्य कृषि अधिकारी किरण कांबळे ‘ऊस तोडणी व्यवस्थापन‘ याबाबत विचार मांडणार आहेत, तर परिसंवादाची सांगता पाचव्या सत्राने होणार असून, किटक शास्त्र कृषि विद्यालयाचे पांडूरंग मोहिते ‘ऊसावरील रोग किड व त्यावरील औैषधे‘ या महत्वाच्या विषयावर विवेचन करणार आहेत.

या कार्यक्रमास आसपासच्या सर्व शेतकर्‍यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here