करोनामुळे मुंबईचा शेअर बाजार सलग सहाव्या दिवशी कोसळला

नवी दिल्ली : जगभरात करोना विषाणूग्रस्तांची संख्या तब्बल 81 हजार झाली आहे. त्यातच डेरिव्हेटिव्ह कंत्राटांची मुदतपूर्ती आज, शुक्रवारी होणार आहे. चीनमधून येणार्‍या मालाची आवक थांबली आहे. त्यामुळे बाजारावर विपरित परिणाम होत आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग सहाव्या दिवशी कोसळला आहे. सेन्सेक्स 1000 अंक खाली येत 38,704 अंकावर येऊन स्थिरावला आहे. तर निफ्टी 300 अंक खाली येत 11,333 वर स्थिरावला.

करोना विषाणू आता जगभरात पसरत चालला आहे. युरोपातील देशांत यामुळे भीतीचे वातावरण आहे. टाटा स्टील, टाटा महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ओएनजीसी या कंपन्यांचे समभाग 5.31 टक्क्यांपर्यंत पडले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here