दिवसभराच्या चढ-उतारनंतर सेन्सेक्स, निफ्टी सपाट बंद

मुंबई : तीन दिवसांच्या तेजीनंतर बाजाराने मंगळवारी काहीशी विश्रांती घेतली आणि सेन्सेक्स, निफ्टी हे दोन्ही निर्देशांक सपाट बंद झाले. सकाळच्या नकारात्मक सुरुवातीनंतर निफ्टीत शेवटपर्यंत फार मोठी हालचाल झाली नाही आणि शेवटी 19,406.70 वर बंद झाला. फार्मा आणि उर्जा क्षेत्रातील शेअर वाढले तर रियल्टी आणि मीडिया क्षेत्रातील शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. स्मॉल कॅप निर्देशांक सुमारे एक टक्का वधारला.

सेन्सेक्स 16.29 अंकांनी घसरून 64,942.40 वर बंद झाला, तर निफ्टी 5.05 अंकांनी घसरून 19,406.70 वर बंद झाला. मागील सत्रात सेन्सेक्स 594.91 अंकांनी वाढून 64,958.69 वर, तर निफ्टी 594.91 अंकांनी वाढून 19,411.75 वर बंद झाला होता. घसरणाऱ्या शेअरमध्ये Hero MotoCorp, Coal India, Bajaj Finance, JSW स्टील आणि Divis Labs यांचा समावेश होता, तर सन फार्मा, BPCL, NTPC, Axis Bank आणि Dr Reddy’s Labs हे शेअर चांगलेच वधारले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here