अर्थव्यवस्थेसाठी शुभ असेल सप्टेंबर, निर्यातीबरोबरच विज उत्पादनही वाढले, पेट्रोलच्या वापरातही गती

नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्ष 2020-21 चा सहावा महिना सप्टेंबर अर्थव्यवस्थेसाठी शुभ असणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांनंतर गेल्या 15 दिवसांमध्ये पहिल्यांदा अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये गती पहावयास मिळत आहे. कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून नकारात्मक वाढ घेणार्‍या निर्यातीत सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसात वाढ नोंद करण्यात आली. औद्योगिक उत्पादनासाठी सर्वात आवश्यक गोष्ट विजेच्या उत्पादनातही गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी सरकारी निर्णयामुळे प्रवासी वाहतुक वाढल्याने पेट्रोलच्या वापरातही वाढ झाली आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानुसार, यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांमध्ये 6.12 अरब डॉलर ची निर्यात करण्यात आली जी गेल्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत 13.35 टक्के जास्त आहे. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार 8-14 सप्टेंबर च्या दरम्यान 6.88 अरब डॉलर ची निर्यात करण्यात आली जी गेल्या वर्षीच्या समान अवधीच्या तुलनेत 10.73 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. यावर्षी एप्रिल पासून ऑगस्टपर्यंत प्रत्येक महिन्याच्या निर्यातीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत घट नोंदवण्यात आली आहे.

सरकारी कंपनी पावर सिस्टिम ऑपरेशन कॉरपोरेशन लिमिटेड च्या आकड्यांनुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये विजेच्या उत्पादनात गेल्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत 1.6 टक्के वाढ झाली आहे. यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान विजेचा उत्पादन स्तर गेल्या वर्षीच्या समान अवधीच्या तुलनेत खाली राहिला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देशातील दोन प्रमुख औद्योगिक राज्य गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसात विजेच्या वापरता गेल्या वर्षीच्या समान अवधीच्या तुलनेत क्रमश: 6.2 आणि 4.3 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. औद्योगिक समृद्धी असल्याने दोन्ही राज्ये देशाच्या जवळपास 20 टक्के विजेचा वापर करतात.

ऑगस्ट महिन्यात देशाच्या जवळपास सर्व राज्यांमध्ये अनलॉक ची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे विजेची मागणी वाढल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. विजेच्या उत्पादनामध्ये गती आल्याने कोळशाच्या उत्पादनातही गती येईल. अर्थव्यवस्था अनलॉक झाल्याने पेट्रोल च्या वापरात सप्टेंबर च्या पहिल्या 15 दिवसात गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्के वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपनीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांच्या तुलनेत पेट्रोलच्या वापरात 7 टक्क्याचा फायदा झाला. सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसात डीजेलच्या वापरात गेल्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत 5.5 टक्के घट झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here