साखर कारखान्यांचे दहा करोड़ क्विंटल ऊस खरेदीचे रेकॉर्ड

133

साखर कारखान्यांचे ऊस खरेदीचे व साखरउत्पादनाचे  रेकॉर्ड
मुजफ्फरनगर :

            जनपद येथील साखर कारखान्यांनी दहा करोड़ क्विंटल ऊसाच्या खरेदीचे रेकॉर्ड केले. यापूर्वी कधीच ऊसाची इतकी खरेदी झाली नव्हती. जिल्ह्यात जोपर्यंत शामली जिल्हा होता तेव्हा ऊसाची इतकी खरेदी झाली नव्हती. आतापर्यंत 3200 करोड़ रुपयाचा ऊस शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे.
              ऊस उत्पादनामध्ये जिल्हा नवे रेकॉर्ड बनवत आहे. पहिल्यांदाच दहा करोड़ क्विंटल पेक्षा अधिक ऊस खरेदी होत आहे.  याबरोबरच साखर उत्पादनातही सातत्याने भरभराट होत आहे. नवे रेकॉर्ड बनवले जात आहेत. यावेळी आतापर्यंत जिल्हयातील साखर कारखान्यांमध्ये एक करोड 17 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. पूर्ण प्रदेशामध्ये आतापर्यंत 12 करोड़ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास प्रदेशातील दहा टक्के साखर उत्पादन होत आहे.

 वार्षिक साखर उत्पादन
2016-17             80 लाख क्विंटल
2017-18             एक करोड़ 9 लाख क्विंटल
2018-19             एक करोड़ 5 लाख क्विंटल
2019-20             एक करोड़ 17 लाख क्विंटल

कारखान्यातील वार्षिक ऊस खरेदी
2016-17             850 लाख क्विंटल
2017-18             932 लाख क्विंटल
2018-19             915 लाख क्विंटल
2019-20             एक हजार लाख क्विंटल
उत्पादन आणि रिकवरी दोन्हीही गोष्टी चांगल्या राहिल्या

जिल्हा ऊस अधिकारी  डा. आरडी द्विवेदी यांनी सांगितले की, यावेळी ऊस उत्पादन चांगले झाले आहे. साखरेचे उत्पादन एक करोड़ 17 लाख क्विंटल इतके झाले आहे. रिकवरी 11.73 टक्के राहिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here