आसाममध्ये सात इथेनॉल युनिट : मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा

78

दिसपूर : आसाममध्ये कमीत कमी सात इथेनॉल युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली. राज्य सरकारच्या इथेनॉल धोरणाअंतर्गत राज्यात १५०० कोटींपासून ते २००० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीसाठी सात युनिट येणार आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय देशातील वाढत्या इंधन दरवाढीपासून देशवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. जर अशीच वाढ सुरू राहीली तर राज्य सरकार कर कपात करू लोकांना दिलासा देईल.

अंमलबजावणी करू. मात्र, एखाद्या महिन्यातील दरवाढीवर हा निर्णय घेतला जाणार नाही. जर इंधनाचे दर दिर्घकाळासाठी चढे राहीले तर आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न करू. मी आसामच्या लोकांना सांगू इच्छितो की आम्हाला अतिरिक्त कर नको आहेत, असे सरमा म्हणाले. जर अशीच दरवाढ सुरू राहिली तर आम्ही जी शक्य असेल ती सूट देऊ. आसाममध्ये इंधनात मिश्रण करण्यासाठी तांदळावर आधारित इथेनॉल युनिट स्थापन करण्यासाठी १४ प्रस्ताव मिळाले आहेत. सरमा यांनी सांगितले की, सात युनिट स्थापन होणार आहेत. आम्ही लवकरच याबाबच्या करारावर स्वाक्षरी करू. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतरची ही मोठी गुंतवणूक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here