पाटणा : बिहार राज्यात इथेनॉल उत्पादनाचे युनिट सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छूक असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी दिली. इथेनॉल प्लांट स्थापन केल्यानंतर शेतकर्यांना आपले खराब झालेले धान्य सरकारने ठरवलेल्या दरांवर उद्योग विभागाला विक्रीची सुविधा उपलब्ध होईल. यातून शेतकर्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. खराब धान्याचा वापर इथेनॉल इंधन उत्पादनात केला जाणार आहे असे मंत्री हुसेन यांनी सांगितले.
हुसेन म्हणाले, इथेनॉल उत्पादनाबरोबरच प्रस्तावित मेगा फूड पार्क, चर्मोद्योग, कापड आणि खाद्य प्रक्रिया युनिटमध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याची क्षमता आहे. त्यातून राज्य एका नव्या उंचीवर पोहोचेल. इथेनॉल उत्पादनासाठी धोरण ठरविणारे बिहार हे पहिले राज्य असल्याचा दावा हुसेन यांनी केला.
माहिती व जनसंपर्क मंत्रालय आणि राज्याच्या उद्योग विभागाच्यावतीने संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये मंत्री हुसेन बोलत होते. राज्यात खाद्य प्रक्रिया युनिटची संधी असा या वेबिनारचा विषय होता.
.