शेती व ऊस विकास उपसमितीच्या अध्यक्षपदी शहाजी देसाई

हिंगोली : पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेती व ऊस विकास उपसमितीच्या अध्यक्षपदी कारखान्याचे संचालक शहाजी साहेबराव देसाई यांची निवड करण्यात आली. देसाई म्हणाले, पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. विविध योजना राबवून उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले. संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखान्याला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही देसाई यांनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम, संचालक गजानन धवन, श्रीधर पारवे, तुकाराम चव्हाण, दत्ता चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here