ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवावी, शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे : भाकियू

208

शामली : भारतीय किसान यूनियन (भाकियू) ची काका नगर मध्ये बैठक झाली. ऊस  थकबाकी सह शेतकर्‍यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच लदाख मधील गलवान घाटीमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

भाकियूचे प्रदेश प्रवक्ता प्रदीप पवार म्हणाले, गाळप हंगाम संपला आहे. पण आतापर्यंत खूपच कमी शेतकर्‍यांना ऊसाचे पैसे दिले गेले आहेत. शेतकर्‍यांचे खिसे रिकामे आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, तांदळाच्या लागवडीसाठी शेतकर्‍यांना कर्ज घ्यावे लागत आहे. घरखर्च चालवणेही अवघड झाले आहे. लॉकडाउनपूर्वी कमीत कमी शेतकर्‍यांना व्यापारी रेशन उधारीवर देत होते, पण आता उधार देखील मिळत नाही. सरकारने शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. आणि लवकरात लवकर व्याजासह पैसे भागवले पाहिजेत. भाकियू चे जिल्हा सचिव दीपक शर्मा म्हणाले, सरकारने 14 दिवसांच्या आत पैसे भागवण्याचे वचन दिले होते, पण हे सरकार आता विसरले आहे. शेतकर्‍यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. लॉकडाउन चा शेतकर्‍यांवर सर्वाधिक परिणाम झाला. पण सरकारकडून त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. भाज्यांची किंमत कवडीमोल झाली आहे. शेतकर्‍यांनी स्वत:च पीक नष्ट केली आहेत.  बैठकीमध्ये जीतू निर्वाल, चौधरीअनिल निर्वाल, योगेंद्र सिंह, अमित निर्वाल, पुष्पेंद्र निर्वाल आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here