ऊस उत्पादनात शामली जिल्हा अव्वल

शामली: शामली जिल्हा 990.64 क्विंटल प्रति हेक्टर ऊसाचे उत्पादन करुन प्रदेशात पहिल्या स्थानावर राहिला आहे. दुसर्‍या नंबरवर मेरठजिल्ह्या ने 910.04 क्विंटल तर तिसर्‍या नंबरवर असलेल्या मुजफ्फरनगर ने 907.64 क्विंटल प्रति हेक्टर ऊसाचे उत्पादन केले आहे.

जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादुर सिंह यांनी सांगितले की, शामली जिल्ह्याने गाळप हंगाम 2017-18 मध्ये ऊसाचे सरासरी 843.40 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन घेवून प्रथम स्थानावर पोचला होता. गाळप हंगाम 2018-19 मध्ये सरासरी 929.40 क्विंटल राहिले होते. यामुळे जिल्हा प्रदेशामध्ये दुसर्‍या स्थानावर गेला होता. 2019-20 मध्ये ऊसाचे सरासरी उत्पादन वाढून 962.12 क्विंटल प्रति हेक्टर झाले आहे. यामुळे जिल्हापुन्हा पहिल्या स्थानावर आला आहे. जून महिन्यामध्ये पूर्ण गाळप हंगाम 2020-21 मध्ये जिल्हा पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर पोचला आहे. जिल्ह्यामध्ये ऊसाचे सरासरी उत्पादन वाढून 990.64 क्विंटल प्रति हेक्टर पोचले आहे. जिल्हा ऊस अधिकारी यांनी सांगितले की, ऊस मंत्री सुरेश राणा तसेच ऊस आयुक्त संजय भूसरेड्डी यांच्या निर्देशनामध्ये ऊस विभागाने चांगले काम केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here