शामली साखर कारखान्याने ऑक्सिजन प्लांट स्थापन करावा: आमदारांची मागणी

156

शामली : शामली साखर कारखान्याने आपल्या कारखान्याच्या परिसरात ऑक्सिजन प्लांट सुरू करावा अशी मागणी भाजप आमदार तेजेंद्र निर्वाल यांनी कारखान्याचे चेअरमन तथा एमडी लाला रजत लाल यांच्याकडे केली आहे. लाल यांनी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यास सहमती दर्शविली असल्याचे आमदार निर्वाल यांनी सांगितले. कारखान्याने जर ऑक्सिजन प्लांट सुरू केला, तर या परिसरातील ऑक्सिजन टंचाईचे संकट दूर होणार आहे.

आमदारांनी सांगितले की, त्यांची सरशादी लाल एंटरप्राइजेसच्या अध्यक्षांशी त्यांची तीन दिवसांपूर्वी भेट झाली होती. शामली साखर कारखान्यात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यास त्यांनी अनुमती दिली आहे. जिल्ह्यात शामली, थानाभवन कारखान्यांनी ऑक्सिजन प्लांट सुरू केला, तर टंचाईची समस्या दूर होईल असे आमदारांनी सांगितले. याबाबत त्यांनी राज्याच्या ऊस आयुक्तांशीची चर्चा केली आहे.

शामली औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्यातील उद्योगपती आणि जिल्हा प्रशासन जिल्हा संयुक्त रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत राज्यातील ऊस मंत्री सुरेश राणा आणि भाजप आमदार तेजेंद्र निर्वाल यांनी आपल्या आमदार निधीतून प्रत्येकी ५० – ५० लाख रुपये देण्याचे पत्र दिले आहेत.

ऑक्सीजन प्लांटची तयारी सुरू
शामली साखर कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक कुलदीप पिलानिया आणि वरिष्ठ ऊस व्यवस्थापक दीपक राणा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी, ऊस मंत्री सुरेश राणा आणि ऊस आयुक्त संजय भूसरेड्डी यांच्या सूचनेनंतर शामली कारखानाही जिल्हा संयुक्त रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट स्थापन करणार आहे. कारखान्याने याची तयारी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here