ऊस FRP बाबत राजू शेट्टी यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

कोल्हापूर : शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारने ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या ऊस गळीत हंगामासाठी जाहीर केलेल्या उसाच्या योग्य आणि लाभदायी दराबाबत (एफआरपी) जोरदार टीका केली आहे. ही निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने बुधवारी ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०२२-२३ च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांकडून दिल्या जाणाऱ्या एफआरपीला १५ रुपये वाढवून प्रती क्विंटल ३०५ रुपये दर जाहीर केला आहे. सरकारने सांगितले की, या निर्णयामुळे जवळपाच पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि पाच लाख कामगारांना लाभ होणार आहे.

दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेट्टी यांनी सांगितले की, सरकारने ऊसासाठी १०.२५ टक्के साखर उताऱ्याला एफआरपी निश्चित केली आहे. गेल्या वर्षीपर्यंत, बेस शुगर रिकव्हरी रेट १० टक्के होता आणि त्यानुसार एफआरपी देण्यात आली होती. गेल्या वर्षी १० टक्के बेस शुगर रिकव्हरी एफआरपी २९०० रुपये होती. आता १० टक्के साखर उताऱ्याच्या दरासाठी एफआरपी फक्त २९७५ रुपये प्रती टन आहे. सरकारने फक्त एफआरपीचा दर वाढवून-चढवून सांगितला आहे.

शेट्टी यांनी सांगीतले की, गेल्या वर्षी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ऊसाचे उत्पादन खर्चातही २१४ रुपये प्रती टन वाढ झाली आहे. शेट्टी म्हणाले की, उसाची किंमत त्याच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट असायला हवी अशी मागणी आम्ही करीत आहोत. ते म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारला एफआरपी बेस शुगर रिकव्हरी रेटमध्ये बदल न करण्याची मागणी करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here