शिंदे कारखान्याकडून तोडणी, वाहतूक ठेकेदारांना ७९ कोटी रुपये अदा : संस्थापक-चेअरमन, आ. बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब या दोन्ही युनिटच्यावतीने गळीत हंगाम २०२३-२४ मधील ऊस तोडणी, वाहतूक ठेकेदारांना ३४ टक्के वाढीचा फरक व कमिशन डिपॉझीटसह ७९ कोटीरुपये अदा करण्यात आले आहेत. कारखान्याने ठेकेदार, मुकादमांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली असल्याची माहिती संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी दिली. फरक व कमिशन डिपॉझीट अदा करणारा राज्यातील एकमेव कारखाना असल्याचा दावा त्यांनी केला.

संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे म्हणाले की, यंदा कारखान्याच्या पिंपळनेर युनिटने १८,९२,९४९ मे. टन तर करकंब युनिटने ६,२५,८८८ मे.टन ऊसाचे गाळप केले. साखर संघाने केलेल्या सामंजस्य करारानुसार, तोडणी कमिशनमध्ये १ टक्का वाढ केली. तोडणी बिले ३४ टक्के वाढीव दराने दिली आहेत. ठेकेदारांना हा ३६.४ कोटी रुपयांचा फरक दिला आहे. तर कमिशन डिपॉझीट ४२.९६ कोटी रुपये दिले आहेत. आता बिगर अॅडव्हान्स तोडणी, वाहतूक करणाऱ्या ठेकेदार, मुकादमांन वाढीव कमिशनचे ५ कोटी रुपये दिले जातील. यावेळी व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here