येणार्‍या काही दिवसात साखरेची निर्यात सामान्य होण्याची आशा

नवी दिल्ली : चीनीमंडी
कोरोना वायरसमुळे जगभरातले अनेक देश प्रभावित झाले आहेत. काही देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन सारखी सावधानता बाळगत आहेत. लॉकडाउन ने आयात निर्यातीवरही परिणाम केला आहे. येणार्‍या काही दिवसांमध्ये ठप्प असलेली साखर निर्यात सामान्य होईल. महसुलाच्या च्या कमीमुळे संघर्ष करणार्‍या साखर कारखान्यांना काही मर्यादेपर्यंत दिलासा मिळू शकतो.

इंडिनय शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) नुसार, कारखाने आणि बंदर येथून मिळालेल्या अहवालानुसार, जवळपास 35 लाख टन साखर कारखान्यांमधून निर्यातीसाठी गेली आहे. इंडोनेशिया आणि ईराण ला निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये साखर निर्यात अनुबंधावर पुन्हा हस्ताक्षर करण्यात येणार आहेत. शिपमेंट देखील होत आहे आणि येणार्‍या दिवसांमध्ये निर्यात सामान्य होण्याची शक्यता आहे.

लॉकडाउनमुळे मार्च आणि एप्रिल 2020 मध्ये साखर विक्रीत घट झाली आहे. गेल्या वर्षी जेवढी विक्री करण्यात आली होती, त्याच्याही जवळपास 10 लाख टन कमी विक्री झाली आहे. साखर उद्योगाकडून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, लॉकडाउन मागे घेताना साखरेची मागणी वाढेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here