बिहार: कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी लिहिणार पंतप्रधानांना पत्र

शिवहर: रीगा साखर कारखाना बंद असल्याने फक्त सितामढी नव्हे तर शिवहरच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरही पाणी पडले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये सरकार आणि प्रशासनाविरोधात असंतोष आहे. शेतकरी, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कारखाना विनाविलंब सुरू केला जावा अशी मागणी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. संघर्षशील युवा अधिकार मंचने जाफरपूर येथील बैठकीत हा निर्णय जाहीर केला. बैठकीत रिगा साखर कारखाना हा शिवहर, सीतामढी, चंपारण, मुजफ्फरपूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान होता. मात्र, कारखाना बंद पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारखाना बंद झाल्याने शेतकरी, कामगार, त्यांचे कुटूंब संकटात सापडले आहेत.

कारखान्याकडे शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. हे पैसेही त्वरीत मिळाले पाहिजेत अशी मागणी करण्यात आली. सुरेंद्र प्रसाद वर्मा, आदित्य कुमार, राकेश गिरी, दीपू कुमार, जितेंद्र कुार, रोहित कुमार, अरविंद कुमार, प्रिंस कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

शिवहर-सीतामढी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या रीगा साखर कारखान्याची स्थापना १९३३ मध्ये ब्रिटिश सरकारच्या कालखंडात करण्यात आली होती. जेम्स फेनले या इंग्रज अधिकाऱ्याने याची स्थापना केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here