शॉर्टसर्किटने साडेतीन एकरातील ऊस जळाला, शेतकऱ्यांचे नुकसान

बोधेगाव : वीज वाहिन्यांतील घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला. गुरुवारी दुपारी शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी शिवारात ही घटना घडली. या प्रकारात दोन शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, तरुणांच्या प्रयत्नामुळे जवळपास दीडशे एकरातील आग रोखण्यात यश मिळाले.

बालमटाकळी शिवारातील या आगीत आबासाहेब शिंदे व अशोक शिंदे यांच्या उसाचे नुकसान झाले. उसाला आग लागल्याचे समजताच रामनाथ राजपुरे, हरिचंद्र घाडगे, सामाजिक कार्यकर्ते बंडू शिंदे, भाऊसाहेब बामदळे, गजानन देशमुख, अमोल बामदळे, उमेश घाडगे, अमोल भिसे, बाबा सोनवणे, अण्णा शिंदे, गोरख शिंदे. प्रवीण देशमुख आदींसह शंभर ते दीडशे तरुणांनी धाव घेती. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी शेतकऱ्यांची भेट घेवून सांत्वन केले. सरकारकडून मदत मिळवून देऊ, असे सांगीतले. आपल्या उसाची रांगोळी झाल्याचे पाहताच शिंदे बंधूंना अश्रू अनावर झाले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट होऊन साडेतीन एकर ऊस जळून सुमारे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here