श्री रेणुका शुगर्सकडून इथेनॉल उत्पादन क्षमतेचा विस्तार

बेळगावी : श्री रेणुका शुगर्सने अथणी आणि मुन्नोळी येथील आपल्या आपल्या विस्तारित इथेनॉल उत्पादन क्षमतेचे कार्य सुरू केले आहे. अथणी येथील इथेनॉल प्लाटंचा ३०० केएलपीडी ते ४५० केएलपीडी आणि मुन्नोळी येथील प्लांटचा १२० केएलपीडी ते ५०० केएलपीडी असा विस्तार करण्यात येत आहे.

याबाबत बिझनेस स्टँटर्डमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार, या प्लांटमधील कमिशनींगची कामे पूर्ण झाल्यानंतर कंपनीची इथेनॉल उत्पादन क्षमता ७२० KLPD वरुन वाढून १२५० KLPD होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here