श्री सुभाष आणि शिऊर साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव

नांदेड : श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड (हडसणी) व शिऊर साखर कारखाना मर्यादित (वाकोडी, ता. कळमनुरी) या दोन्ही कारखान्यामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त कारखाना व्यवस्थापनातर्फे कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र व रोख रक्कम आणि साखर बॅग देवून गौरव करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री सुभाष शुगर कारखान्याच्या प्रांगणात डेप्युटी चिफ इंजिनिअर एकनाथ गिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिऊर साखर कारखाना येथे इलेक्ट्रीकल मैनेजर प्रवीण कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमानंतर गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. श्री सुभाष शुगर व शिऊर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुशील कुमार देशमुख व चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यामध्ये गुणवंतांना प्रशस्तीपत्र, रोख ५ हजार रुपये आणि साखर बॅग देऊन सन्मान केला. यावेळी कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी मधुकरराव पतंगे, चीफ केमिस्ट महेश पाटील, संभाजी नातू, किशोर वानखेडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here