श्री रेणुका शुगर, राजश्री शुगरच्या शेअर्समध्ये उसळी

122

मुंबई : शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात शुगर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. श्री रेणुका शुगर्स आणि राजश्री शुगर्सचे शेअर्स १० डिसेंबर रोजी सुरुवातीच्या सत्रात ५ टक्के अप्पर सर्किटला पोहचले. गायत्री शुगर्सचे शेअर्सही अप्पर सर्किटच्या स्तरावर राहीले.

तर बजाज हिंदुस्थान आणि शक्ती शुगर्ससारखे शेअर अनुक्रमे ३ आणि २ टक्क्यांनी वधारले. ९ डिसेंबर रोजी बलरामपूर शुगर्स, दालमिया भारत आणि त्रिवेणी इंजिनीअरिंग यांसारख्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती. मात्र बहुतांश शेअर आपल्या ५२ आठवड्याच्या उच्चांकापासून लांब आहेत. रेणुका शुगर्स आपल्या ५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरापासून जवळपास ३० टक्के दूर आहे. तर राजश्री शुगर १० टक्के लांब आहे. बजाज हिंदुस्थान आणि शक्ती शुगर्स आपल्या ५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरापासून ३०-४० टक्के कमी अंतरावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here