श्री शंकर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

सोलापूर : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील शंकर सहकारी साखर कारखान्याचा यंदाच्या गळीत हंगाम २०२३-२४ साठी ५१ वा बॉयलर अग्निप्रदीपन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. संचालक सुनील माने व सविता सुनील माने यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. गळीत हंगामासाठी सर्व पूर्वतयारी झाली आहे. कारखाना गाळप हंगामासाठी सज्ज असल्याची माहिती श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन तथा आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.

कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, अर्जुनसिंह मोहिते- अर्जुनसिंह मोहिते- पाटील, शशी गरड, संजय कोरटकर, रामदास कर्णे, दत्तात्रय रणवरे, चंद्रकांत शिंदे, शिवाजी गोरे, भगवान मिसाळ, चव्हाण, धोंडीराम नाळे, अर्जुन धाईंजे, सुधाकर पोळ, रमेश जगताप, अलका पाटील, देवयानी सालगुडे-पाटील, अनंतलाल दोशी, मानसिंग मोहिते, प्रताप सालगुडे-पाटील, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, रविराज जगताप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here