श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भारत भालके यांचे निधन

275

पुणे: पंढरपुरातील वेणुनगर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भारत भालके यांचे शुक्रवारी (ता.२७) मध्यरात्री निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. शनिवारी (ता.२८) सकाळी पंढरपूरमधील सरकोली या गावी भालकेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भालके यांना ३० ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर कोरोनातून बरे होऊन घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. शुक्रवारी त्यांचे पुण्यात निधन झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here