श्रीपती शुगर तीन हजार दर देणार : आ. डॉ. विश्वजित कदम

सांगली : जत तालुक्यातील श्रीपती शुगर अॅण्ड पॉवर लि. डफळापूर कारखाना चालू गळीत हंगामात एकरकमी ३००० रुपये प्रति टन दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन आ. डॉ. विश्वजित कदम यांनी केली.

आ. डॉ. विश्वजित कदम म्हणाले, श्रीपती शुगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आहे. मागील चाचणी गळीत हंगामात एकरकमी २८०० रुपये दर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वेळेत रक्कम जमा केली. कार्यक्षेत्रात ऊसतोडणी मजूर दाखल होऊन गळीत हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी ४ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, श्रीपती शुगरचे कार्यकारी संचालक व जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, भारती शुगरचे चेअरमन ऋषिकेश लाड, जनरल मॅनेजर महेश जोशी, शेती अधिकारी हणमंत धारीगौडा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here