महाराष्ट्रात १९० साखर कारखान्यांकडून गाळप

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही साखर कारखान्यांचे गाळप गतीने सुरू आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये ९ जानेवारी २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १९० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी आणि ९५ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ५४७.०९ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५३६.८९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.८१ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत १३०.९४ लाख टन उसाचे गाळप करून १४५.९६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ११.१५ टक्के आहे.

पुणे विभागात हंगाम २०२१-२२ मध्ये ९ जानेवारी २०२२ पर्यंत एकूण २९ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये १६ सहकारी तर १३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ११२.११ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. पुणे विभागात ११२.१९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागाचा सरासरी साखर उतारा १०.०१ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here