काटामारी केल्यास गाळप परवाना रद्द : साखरमंत्री शिवानंद पाटील

गुलबर्गा : साखर कारखान्यांनी वजन ऊस करताना काटामारी केल्यास संबंधित कारखान्यांच्या गळीत हंगामाची परवानगी रद्द करण्याचा इशारा कर्नाटकचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी दिला. गुलबर्गा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ऊस उत्पादकांनी एपीएमसीमध्ये उसाचे वजन करून पावती घ्यावी. त्यानंतरच कारखान्यांना उसाचा पुरवठा करावा. वजनात फसवणूक करण्यात आल्यास त्याविरुद्ध तक्रार दाखल करावी. काटामारी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब सरकारने गांभीर्याने घेतली आहे. फसवणुकीला बळी पडलेल्यांनी लेखी तक्रार केल्यास संबंधित कारखान्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here