एकूण कोळसा उत्पादन आणि वितरणात फेब्रुवारी 2024 मध्ये लक्षणीय वाढ

कोळसा मंत्रालयाने फेब्रुवारी 2024 महिन्यात एकूण कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. 96.60 दशलक्ष टन (एमटी) (तात्पुरते) कोळसा उत्पादन गाठले आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 86.38 मेट्रिक टन च्या आकडेवारीला मागे टाकून त्याने 11.83% वाढ नोंदवली आहे. कोल इंडिया लिमिटेडचे (सीआयएल) उत्पादन फेब्रुवारी 2024 मध्ये 74.76 मेट्रीक टनावावर (तात्पुरते) पोहोचले आहे, ते 8.69% च्या वाढीसह फेब्रुवारी 2023 मध्ये 68.78 मेट्रीक टन होते.

एकुण कोळसा उत्पादन (फेब्रुवारी 2024 पर्यंत) 12.14 % वाढीसह आर्थिक वर्ष 22-23 मधील 785.39 मेट्रीक टनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 23-24 मध्ये 880.72 मेट्रीक टनापर्यंत (तात्पुरती) वाढले आहे.

याव्यतिरिक्त, फेब्रुवारी 2024 मध्ये कोळशाच्या वितरणात लक्षणीय वाढ दिसून आली, ती 84.78 मेट्रीक टनापर्यंत (तात्पुरती) पोहोचली. फेब्रुवारी 2023 मध्ये नोंदवलेल्या 74.61 मेट्रीक टनाच्या तुलनेत उल्लेखनीय प्रगती दाखवून, त्यात 13.63% वाढ झाली. त्याच वेळी, कोल इंडिया लिमिटेडच्या (सीआयएल) वितरणात उत्कृष्ट कामगिरी दर्शवित फेब्रुवारी 2024 मध्ये 65.3 मेट्रीक टनाचा (तात्पुरती) टप्पा गाठला. फेब्रुवारी 2023 मध्ये 58.28 मेट्रीक टनाच्या तुलनेत, 12.05 % ची वाढ झाली. एकुण कोळसा वितरण (फेब्रुवारी 2024 पर्यंत) 11.08% च्या वाढीसह आर्थिक वर्ष 22-23 मधील 794.41 मेट्रीक टनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 23-24 मध्ये 882.44 मेट्रीक टनापर्यंत (तात्पुरती) लक्षणीय वाढ झाली आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांना आधार देण्यासाठी स्थिर कोळसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्व भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांना अधोरेखित करते. देश आत्मनिर्भरता आणि शाश्वत विकासाच्या ध्येयदृष्टीचा पाठपुरावा करत असताना, कोळसा उद्योग विकास आणि समृद्धीला चालना देण्यासाठी आपल्या समर्पणात दृढ आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here